*कोकण Express*
*असलदे ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यांना कोविड विमा संरक्षण कवच*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यांना कोविड विमा संरक्षण कवच ग्रामपंचायत मार्फत देण्यात आले. मधुसूदन परब, प्रकाश वाळके, सत्यवान घाडी या तीन कर्मचारी यांना १ लाख प्रमाणे विमा संरक्षण कवच देण्यात आले असून पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी सरपंच पंढरी वायंगणकर, उपसरपंच संतोष परब, ग्रामपंचायत सदस्य दिनकर दळवी, संचिता नरे, प्रतिभा खरात, वंदना हडकर, ग्रामसेवक आर. डी सावंत आदी उपस्थित होते