*कोकण Express*
*राज्य उत्पादन शुल्क विभागाने इन्सुली येथे दारूसह ४३ लाखाचा मुद्देमाल जप्त!*
*रत्नागिरी ग्रामीण उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची संयुक्त कारवाई!*
*बांदा ः प्रतिनिधी*
मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली उत्पादन शुल्क विभागाच्या चेक नाक येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा ट्रक मध्ये होणा-या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात आली. सदरच्या कारवाईत ३३ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारुसह एकूण ४२ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला.
इन्सुली येथील तपासणी नाक्यावर रत्नागिरी ग्रामीण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली . दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणार टाटा ट्रक तपासणी साठी थांबण्यात आला. त्यावेळी ट्रकच्या मागील हौद्यात लाकडी फळ्यांखाली बनविलेल्या कप्प्यांमध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे ५०० बॉक्स सापडले सदर त्याच्यावर कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात इंदौर, राजस्थान येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई जिल्हा अधिक्षक डॉ एच बी तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण, दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे, जवान शिवशंकर मुपडे, रत्नागिरी ग्रामीण पथकाचे दुय्यम निरीक्षक स्स्त्यावन भगत, डी एस कालेलकर, एस एस धोत्रे यांनी केली. अधिक तपास शिवाजी काळे करत आहेत.