*कोकण Express*
*ओरोस फाटा येथील शिवस्मारकाचा काही भाग कोसळला*
*ओरोस ः प्रतिनिधी*
ओरोस फाटा येथील शिवस्मारकाची दुरुस्ती करण्याकडे वारंवार लक्ष वेधून प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज या स्मारकाचा काही भाग कोसळला आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत जिल्हावासिय आणि शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नसून साऱ्या हिंदुस्थानचे दैवत आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. याबाबत प्रेरणा मिळावी म्हणून महाराष्ट्रात जागोजागी शिवस्मारक उभारण्यात आली आहेत. त्याच उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीत ओरोस फाटा हे स्मारक उभारले आहे. परंतु दुर्दैवाने प्रशासन याची देखभाल करीत नाही. त्यामुळे या स्मारक परिसरात पावसाळ्यात झाली झुडपे वाढतात, अनेक ठिकाणी बांधकामांना भेगा पडल्या आहेत. त्यात स्मारकासमोरील लोखंडी कमान गंजून खराब झाली होती. या कमानीची तत्काळ दुरुस्ती होणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ही कमान कोसळ