*कोकण Express*
*शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने कोविड योध्यांचा सत्कार*
*माधवराव पवार विद्यालय कोकिसरे कार्यक्रम संपन्न*
*वैभववाडीीः प्रतिनिधी*
शिवसेना युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने कोविड योध्यांचा सत्कार समारंभ माधवराव पवार विद्यालय कोकिसरे येथे संपन्न झाला.*
कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा केलेल्या आरोग्य विभागातील डॉक्टर, तसेच तौक्ते वादळात वैभववाडी तालुक्यात मोठे नुकसान होऊन पडझड झाली होती त्या प्रसंगी वीज वेळेत चालू त्याबद्दल महावितरणचे सर्व वायरमन तालुक्यातील प्रत्येक गावा गावात सामान्य कार्यकर्त्यांनी सुध्दा भरीव योगदान देऊन आरोग्य यंत्रणेला चांगले सहकार्य करून कोविड आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, नंदू शिंदे यांनी संदेश पारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
*यावेळी व्यासपीठावर शिवसेना युवा नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे,शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये,नंदू शिंदे, माजी जि. प. उपाध्यक्ष संदेश पटेल, माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे,संजय चव्हाण, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, खांबाळे सरपंच गौरी पवार, माजी नगरसेवक संतोष पवार, सोनाळी सरपंच भीमराव भोसले, लोरे सरपंच विलास नावळे आदी उपस्थित होते.*
या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्येने कोविड योध्ये उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार स्वप्नील धुरी यांनी केले.