*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची ६ जुलै रोजी देवगड फिशरमेंस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेला सदिच्छा भेट..*
*सिंधुदुर्ग*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी ६ जुलै रोजी देवगड फिशरमेंस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेला सदिच्छा भेट दिली. सभासदांच्या किसान क्रेडिट कार्ड कर्जाचे मच्छीमारांना वितरण करण्यात आले.मच्छीमारांचा विमा , खलाशी व नौकांच्या विमा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले .तसेच मच्छिमार कुटुंबियांचा मेडिक्लेम सभासदांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज संदर्भात या सूचना केल्या. होत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले .
संस्थेने आपली वसुली त्या प्रमाणे प्रभावीपणे करून सभासदभिमुख योजना राबविणे संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेतर्फे चेअरमन द्विजकांत कोयंडे, व्हाईस चेअरमन सचिन कदम, तज्ञ संचालक उल्हास मणचेकर, यांनी जिल्हा बँकेकडून मच्छीमारांना मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले .याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक कमिटी सदस्य उमेश आंबेरकर सचिव कमलेश खोत सहा .सचिव रघुवीर राणे आणि उमेश कदम येऊ नौका मालक दत्ताराम कोयंडे ,शंकर कुबल उपस्थित होते.