*कोकण Express*
*राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर सावंतवाडीत भाजपकडून जल्लोष…*
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ देण्यात आल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडीत फटाके वाजवून जल्लोष केला.यावेळी नारायण राणे आगे बढो,हम तुम्हारे साथ है!,अशा घोषणा देण्यात आल्या.नगराध्यक्ष संजू परब व शहराध्यक्ष अजय गोंदावले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
यावेळी नगरसेवक मनोज नाईक,आनंद नेवगी,पंचायत समिती माजी सभापती रवींद्र मडगावकर,दिलीप भालेकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.