सिंधुदुर्ग भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध

सिंधुदुर्ग भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध

*कोकण  Express*

*सिंधुदुर्ग भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा निषेध…*

*१२ आमदारांचे निलंबन चुकीचे; जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना दिले निवेदन…*

*सिंधुदुर्गनगरी ता.०६:*

भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा आज जिल्हा भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी यासंदर्भात जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले.जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली ही भेट घेण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई, मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे व रुपशे कानडे उपस्थित होते

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महावसुली आघाडी राज्य सरकारने तालिबानी पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपाच्या १२ आमदारांचे एक
वर्षभरासाठी निलंबन केले आहे. जनतेच्या कोणत्याही प्रश्नांना न्याय न देता भोंगळ पद्धतीने सरकारचा कारभार चाललेला आहे. लोकशाहीत जनतेच्या मनातील राग व्यक्त
करण्याचा अधिकार विरोधकांना असतो, पण लोकशाहीच्या संकेतांचे पालनही या सरकारला करता आलेले नाही. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये केवळ यासाठीच अशा अशोभनीय कृतीचा आधार या पळपुट्या सरकारने घेतला आहे. या सरकारचा निषेध
आम्ही या निवेदनाद्वारे करत आहोत. आमचे हे निवेदन जनतेशी कसलेच सोयरसुतक न राहिलेल्या या महाविकास आघाडीच्या सरकारपर्यंत जसेच्या तसे पोहोचवावे, अशी विनंती या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे, यावेळी जिल्हाधिकारी यांनी सदरचे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!