वैभववाडी तालुका भाजपाच्यावतीने तिघाडी सरकारचा जाहीर निषेध.तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन

वैभववाडी तालुका भाजपाच्यावतीने तिघाडी सरकारचा जाहीर निषेध.तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन

*कोकण Express*

*वैभववाडी तालुका भाजपाच्यावतीने तिघाडी सरकारचा जाहीर निषेध.तहसीलदार रामदास झळके यांना निवेदन*

*वैभववाडी ःःप्रतिनिधी* 

महावसुली तिघाडी सरकारने तालिबानी पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. असे अशोभनीय कृत्य करणाऱ्या या पळपुट्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. याबाबतचे निवेदन वैभववाडी भाजपच्या वतीने तहसीलदार रामदास झळके यांना देण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, पंचायत समिती उपसभापती अरविंद रावराणे,  जिल्हा भाजपा चिटणीस भालचंद्र साठे, माजी नगरसेवक संजय सावंत, महिला पदाधिकारी प्राची तावडे आदी उपस्थित होते.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे महावसुली सरकार आहे. या सरकारचा कारभार भोंगळ पद्धतीने सुरू आहे. जनतेच्या प्रश्नांना न्याय हे सरकार देऊ शकत नाही. जनतेच्या मनातील राग व्यक्त करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. सभागृहात जनतेच्या प्रश्नांना वाचा फुटू नये केवळ यासाठीच या सरकारने निलंबनाचे अशोभनीय कृत्य केले आहे. या सरकारचा निषेध करत असल्याचे भाजपने म्हटले आहे. सोयर-सुतक नसलेल्या या तीघाडी सरकारपर्यंत हे निवेदन जसेच्या तसे पोहचवावे असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!