*कोकण Express*
*खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला शिवसेनेच्या वतीने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर भेट*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या मागणीनुसार राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या वतीने कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर नुकताच जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदेश पारकर, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा पमुख मीनल तळगावनकर, तालुका प्रमुख शैलेश भोगले, उपतालुका प्रमुख शरद वायगगणकर, खारेपाटण – तळेरे शिवसेना विभागप्रमुख महेश कोळसुलकर, शिवसेना कार्यकर्ते संदेश पटेल, खारेपाटण शाखाप्रमुख शिवाजी राऊत, संतोष गाठे, गिरीश पाटणकर, संतोष तुरळकर, दिगंबर गुरव, युवा सेनाप्रमुख तेजस राऊत, प्रज्योत मोहिरे आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम यांच्याकडे शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांच्या वतीने ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सुपूर्द करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.