*कोकण Express*
*खारेपाटण कोविड सेंटरला पालकमंत्री उदय सामंत यांची भेट*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी लोकसहभागातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला आज दि. २२ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली व येथील कोविड सेंटरची पाहणी केली.
यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण – तळेरे शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर, युवा सेना प्रमुख तेजस राऊत, शाखाप्रमुख शिवाजी राऊत, यांसह गिरीश पाटणकर, संतोष गाठे, भूषण कोळसुलकर, प्रसाद गाठे हे शिवसैनिक उपस्थित होते.
खारेपाटण कोविड केअर सेंटरच्या सदिच्छा भेटी दरम्यान येथील सोयी सुविधांची पाहणी करून पालकमंत्री उदय सामंत यांनी समाधान व्यक्त केले असून, खारेपाटण कोविड सेंटरला लागेल ती मदत आपण करणार असून तशा प्रकारच्या सूचना आपण स्थनिक जिल्हा