*कोकण Express*
*सावंतवाडीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा*
*जोरदार नारेबाजी करीत कृषी कायद्यांची करण्यात आली होळी*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
राष्ट्रीय कॉंग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज सावंतवाडी तालुका कॉंग्रेसकडून तहसीलदार कार्यालय समोर आज जोरदार घोषणाबाजी करून संकल्प करण्यात आला. यावेळी ” राहुलजी को लाना हैं! महेंगाई को हटाना हैं!” , राहुलजी को लाना हैं! देश को बचना है !” अशा विविध घोषणा देत. यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या तीन काळ्या कृषी कायद्याची होळी करण्यात आली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेल कर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, तालुका उपाध्यक्ष सच्चिदानंद बुगडे, तालुका प्रवक्ते अँड. संभाजी सावंत, माजी सरपंच माडखोल संजय लाड, शहर अध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, तालुका सरचिटणीस संजय राऊत, विल्यम साल्डाना, जास्मिन लक्ष्मेश्वर, माया चिटणीस, नूतन सावंत, अभय मालवणकर, राकेश चितारी, सुहास सावंत, बबन डिसोजा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.