*कोकण Express*
*नांदगाव उड्डाण पूल वाहनांसाठी धोकादायक*
*नांदगाव उड्डाण पुलावर दारूच्या बाटल्यांच्या काचा,अनेक वाहनांचे टायर होतायत पंचर*
*नांदगाव ःःप्रतिनिधी (अनिकेत तर्फे)*
मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही चालू आहे नांदगाव उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी सर्व्हिस रोड अजूनही बाकी आहे म्हणून उड्डाण पूल वाहनांसाठी पूर्ण पणे चालू केलेलं नाही. त्या मुळे दारू पिणार्यांनी उड्डाण पूल हे दारूचं ठिकाण बनवलं आहे.
नांदगाव उड्डाण पुलावर असंख्य दारू पिणारी लोक रोज संध्याकाळची बसलेली असतात आणि दारूच्या बाटल्या तिथेच फोडून टाकतात. त्या मुळे आता पर्यंत कितीतरी मोटरसायकलचे टायर पंचर झाले आहेत.
ग्रामपंचायतीने नांदगाव उड्डाण पुलावर दारू पिणार्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. त्या बरोबर सर्व्हिस रोडच काम पूर्ण होत नाही तो पर्यंत उड्डाण पूल वाहनांसाठी पूर्ण पणे बंध करावं अशी मागणी नागरिक करत आहेत.