*कोकण Express*
*पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडी जनता दरबारातील शब्द केला पूर्ण*
*पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या छप्परसाठी ३७ लाखाच्या अंदाजित रक्कमेला मान्यताा*
*शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
गेल्यावर्षीच्या २०२० च्या जुलै महिन्याच्या वैभववाडी पंचायत समितीच्या जनता दरबारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यावेळी वैभववाडी पंचायत समिती नूतन इमारतीच्या छप्परसाठी ज्यादा निधी देण्याचे मान्य केले होते. त्याच अनुषंगाने राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज या कामासाठी ३७ लाखाच्या अंदाजित रक्कमेला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली आहे.
गतवर्षी झालेल्या जनता दरबारमध्ये नूतन इमारतीच्या गळतीबाबत वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी माननीय पालकमंत्री यांच्या समोर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी पालकमंत्री महोदयांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागास या वाढीव छप्परच्या निधीसाठी महाराष्ट्र विभागाच्या ग्रामविकास विभागाकडे तात्काळ प्रस्ताव सादर करा, असे आदेश दिले होते. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर केल्यावर ग्रामविकास व राज्य नियोजन विभागाकडे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यामूळे आज या इमारतीच्या छप्परच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. वैभववाडी पंचायत समिती येथील इमारत बांधकामाच्या मूळ प्रशासकीय मान्यता रुपये २ कोटी ५४ लाख ८४ हजार रक्कमध्ये / रु. ३७ लाख ३७ हजार इतकी वाढ करून रुपये २ कोटी ९२ लाख २० हजार रुपये इतक्या रक्कमेच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. तरी उर्वरित इमारतीचे काम लवकरच पूर्ण होईल तसेच या गेल्या अनेक वर्षे रखडलेल्या या इमारतीला मिळालेल्या निधीमूळे ती लवकरच पुर्णत्वास जाईल. जनता दरबारात दिलेला शब्द पालकमंत्री महोदय यांनी पुर्ण केल्यामुळे तालुक्याच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त केले जात आहेत.