*कोकण Express*
*जिल्ह्याचा कोरोना बाधित दर ७.४७ टक्के*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
जिल्ह्यात कोरोना टेस्ट मध्ये वाढ केल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोझिटिव्हीटी रेट ३० टक्केचा वर होता. परंतु, तो पोझिटिव्हीटी रेट आज ७.४७ टक्केवर आला आहे. जिल्ह्याचा पोझिटिव्हीटी रेट हा सकारात्मक रित्या कमी होत आहेत.तसेच खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यात चार तज्ञ डॉक्टर आले असून, ते १५ दिवस जिल्ह्यात राहणार आहेत. तसेच जिल्ह्याचा पोझिटिव्हीटी रेट ३ टक्केपेक्षा कमी करण्यासाठी सहकार्य करणार आहेत. त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात पोझिटिव्हीटी रेट ५ पेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन द्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी येत्या आठ दहा दिवसात १८ ते ४४ वयोगटातील पत्रकारांना लसीकरण करण्यासंदर्भात निर्णय होईल असे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्ह्याला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.