*कोकण Express*
*मंजूरी मिळूनही कोविड सेंटर उभारण्यासाठी विलंब..*
*कोविड सेंटरला जागा न देण्यामागे नेमका उद्देश काय ?*
भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा जिल्हा शल्य चिकित्सकांना सवाल
*कणकवली ः (संजना हळदिवे)*
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस याच्या दौ – यादरम्यान झालेल्या आढावा बैठकीमध्ये कोविड सेंटरची आवश्यकता लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी तर्फ कोविड सेंटर तयार करण्याबाबत चर्चा झाली . त्यासाठी जागा उपलब्ध होण्याकरिता आमदार प्रसाद लाड यांचे दि .२८ मे २०२१ व माझे माझे ७ मे २०२१ पत्राद्वारे मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी दि . 01/09/२०११ रोजीच्या पत्राने डॉ.बाबासाहेब आबेडकर वसतिगृह देवगड २ , शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह मालवण ३, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सावंतवाडी अश्या 3 जागाना मंजूरी देण्यात आली . त्यानंतर ५ दिवसापूर्वी आपण माझ्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा करून सदर जागा बदलून देतो असे सांगितले. पण त्यावर अदयाप पर्यंत काहीही कार्यवाही झाली नाही .जिल्ह्यात कोरोनाची गंभीर स्थिती पाहता कोविड़ सेंटर उभारणे गरजेचे असताना आपण या विषयात का चालढकल करत आहात ? यामागे आपला काय उद्देश आहे ? हे समजून येत नाही आहे . मंजूरी मिळूनही कोविड सेंटर उभारण्यासाठी विलंब होत असल्यामुळे जनतेचे हाल होत आहेत. तसेच त्यांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे .तरी आपण याचा गांभीर्याने विचार करून २ दिवसात कोविड सेंटर साठी जागा उपलब्ध करून न दिल्यास जनतेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या रोषाला आपल्याला सामोरे जावे लागेल. यातून जी परिस्थिति निर्माण होईल त्याला पुर्णपणे जबाबदार आपण आणि आपले कार्यालय राहील याची नोंद घ्यावी असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदनाद्वारे दिला आहे.