*कोकण Express*
*तळेरे-कासार्डेतील उद्योगपती श्रावणशेठ बांदिवडेकर यांचे निधन*
*सर्वसामान्यांचा आधारवड, शेकडोंचा पोशिंदा काळाच्या पडद्याआड*
*तळेरे ः प्रतिनिधी*
तळेरे कासार्डे पंचक्रोशीतील सिलीका माइन्समधील प्रसिद्ध उद्योगपती श्रावणशेठ शांताराम बांदिवडेकर (वय 67) यांचे कोल्हापूर येथे उपचार घेत असताना मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
कासार्डे तळेरे परिसरात अतिशय शांत, संयमी आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असले श्रावणशेठ बांदिवडेकर गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जात. शैक्षणिक, क्रीडाक्षेत्र, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांनी केलेली सढळहाताने भरीव मदत पंचक्रोशी कधीच विसरू शकणार नाही.
२५ वर्षापुर्वी अतिशय कठीण परिस्थितीत मायनिंग व्यवसाय अतिशय मेहनतीने उभा करून त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. शून्यातून प्रारंभ करून अतिशय कष्टाने व जिद्दीच्या जोरावर ते या क्षेत्रात यशस्वी झालेले पहिले उद्योजक होय.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, दोन सख्खे भाऊ, दोन चुलत भाऊ, दोन बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी सकाळी त्यांच्यावर तळेरे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.