*कोकण Express*
*गोवा हद्द या ठिकाणी कडक बंदोबस्त असतानाही गोवा बनावटीची दारू ओसरगाव पर्यंत कशी काय पोहोचते*
*मनसे तालुकाअध्यक्ष गुरुदास गवंडे*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
गोव्याची दारु आज बांदा या ठिकाणी कडक बंदोबस्त असतानादेखील ओसरगाव या ठिकाणी पोहोचते तरी कशी आज लॉकडाउनच्याकाळात मोठ्या प्रमाणात सर्रास गोवा बनावटीची दारू जिल्ह्यातून अनेक मार्गातून बाहेर जाते तसेच काही चार चाकी गाड्यांच्या काचा ह्या ब्लॅक असून त्याच्या मधून मोठ्या प्रमाणात दारू निघते असा आमचा अंदाज आहे लॉकडाऊन च्या काळात आतापर्यंत कोट्यावधी रुपयाची दारू जिल्ह्यात पकडण्यात आली आज बांदा चेक पोस्ट तसेच इन्सुली या ठिकाणी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचे ऑफिस आहे मग एवढ्या लांब पर्यंत दारू कशी काय जाते यामागे कोणतरी बड्या अधिकाऱ्याचा हात असल्याशिवाय अशी दारू जात नाही काही दिवसापूर्वी या अवैद्य धंदेवाल्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली होती अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचण्यात आली आम्ही सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.रोहिणी सोळंके यांनाही यापूर्वी निवेदन दिलं होतं की सावंतवाडी तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी चेक पोस्ट आहेत त्या त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवा परंतु काही ठिकाणी तर सर्रास दारू सीमेवरून बाहेर निघते यामध्ये झारीतील शुक्राचार्य कोण आहे याची दखल घेतली पाहिजे काही ठिकाणी तर उत्पादनशुल्क च्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गाड्या पकडल्या आज सर्वसामान्य लोक जनता घरात बसून आहे परंतु लॉकडाउनच्याकाळात राज्याच्या सीमा बंद असताना दारूचे अनेक प्रकार उघडकीस येत आहे त्यामुळे या घटनेची तात्काळ दखल घेऊन झारीतील शुक्राचार्य कोण हे पाहणे गरजेचे आहे उत्पादन शुल्क अधिकारी हे वेगवेगळ्या ठिकाणावरून येत असतात त्यांना स्थानिकांची माहिती नसते म्हणूनच उत्पादन शुल्क अधिकारी दारू च्या गाड्या पकडण्यात यशस्वी होतात परंतु हे स्थानिक पोलीस प्रशासन मात्र कानावर हात घेऊन गप्प बसतात जसे की आपणाला यातील काही माहितीच नाही असे मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री गुरुदास गवंडे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे