*कोकण Express*
*माजी आ. मनसे सरचिटणीस जीजी उपरकर यांच्या उपस्थितीत माणगाव तालुका कुडाळ येथील तरुणांनाचा भव्य पक्षप्रवेश*
*कुडाळ ःःप्रतिनिधी*
राज साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन, माजी आमदार जीजी उपरकर यांच्या निर्भीड कामाने भारावून,मनसे पदाधिकारी, व महाराष्ट्र सैनिक यांच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक कामांनी प्रभावित होऊन. समाजसेवेचा वसा मनसेच्या माध्यमातून चालवीण्याचा आमचा मानस असल्याची आपली भावना प्रवेशकर्त्या सर्व तरुणांनी बोलून दाखविली.
संदीप गुरूंनाथ मेस्त्री, राहुल शशिकांत मेस्त्री, संदेश गुरुनाथ मेस्त्री,योगेश बाळकृष्ण मेस्त्री, संतोष गुरुनाथ मेस्त्री, ओंकार रमेश मेस्त्री. या माणगाव येथील तरुणांनी पक्षप्रवेश केला.संदीप गुरुनाथ मेस्त्री यांची माणगाव शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.सर्व तरुण प्रवेश कर्त्यांना जीजी उपरकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, मनवीसें जिल्हाध्यक्ष कुणाल कीनळेकर, बाबल गावडे, प्रसाद गावडे, राजेश टंगसाळी आदी उपस्थित होते.