*कोकण Express*
*मानवाधिकार ट्रस्ट अंतर्गत ‘महिला सुरक्षा फाउंडेशन ऑफ इंडिया’ च्या राष्ट्रीय प्रभारी पदी अपर्णा कोठावळे यांची निवड*
*शिवसेना सावंतवाडी तालुका महिला संघटक तथा हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या चिटणीस म्हणून कार्यरत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मानवाधिकार न्याय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या ‘महिला सुरक्षा फाउंडेशन ऑफ इंडिया’ च्या राष्ट्रीय प्रभारी पदी शिवसेना सावंतवाडी तालुका महिला संघटक तथा हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या चिटणीस अपर्णा कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल ( दिल्ली, सुप्रीम कोर्ट वकील) आणि महिला सेलच्या राष्ट्रीय अध्यक्ष रुमा पाठक ( दिल्ली, सुप्रीम कोर्ट वकील) यांनी दिले आहे.
सावंतवाडी तालुक्यात तसेच जिल्ह्यातील अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले काम, कोरोना काळात काम करणाऱ्या आशा ताई साठी केलेले कार्य, महिलांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन केलेले काम, तसेच स्वतः पुढाकार घेऊन निस्वार्थी वृत्तीने करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती राष्ट्रीय प्रभारी पदी करण्यात आली आहे. अपर्णा कोठावळे यांना महिला सुरक्षा फाउंडेशन ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना महिलांचे प्रश्न सोडवण्यास आणखी बळ मिळाले आहे. त्याच्या करण्यात आलेल्या या नियुक्तीमुळे सर्वच स्तरातून विशेषतः महिला वर्गातून कौतुक केले जात आहे.