ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कोरोना योद्धा नर्स यांचा सत्कार

ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कोरोना योद्धा नर्स यांचा सत्कार

*कोकण Express*

*ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कोरोना योद्धा नर्स यांचा सत्कार*

*कणकवली ः संजना हळदिवे*

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्यावतीने उद्या रविवार १३ जून रोजी सकाळी ९ वाजता विजयराव नाईक फार्मसी कॉलेज शिरवल येथे वृक्षारोपण केले जाणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता ओरोस येथे कोरोना योद्धा नर्स यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सोमवार दि. १४ जून रोजी सकाळी ११ वा.गरजु नागरिकांना आवश्यकतेनुसार वापरण्याकरिता कुडाळ शिवसेना शाखा येथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स उपलब्ध करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!