“कणकवली, देवगड, वैभववाडी नगरपंचायतींना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी दिला 93.91 लाखांचा विशेष निधी”

“कणकवली, देवगड, वैभववाडी नगरपंचायतींना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी दिला 93.91 लाखांचा विशेष निधी”

*कोकण  Express*

*”कणकवली, देवगड, वैभववाडी नगरपंचायतींना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी दिला 93.91 लाखांचा विशेष निधी”*

*”पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश

*शिवसेना नेते संदेश पारकर यांची माहिती*

*कणकवली ः संजना हळदिवे*

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींना वैशिष्ट्यपुर्ण कामांसाठी विशेष निधी दिला जातो. हा निधी कणकवली, देवगड, वैभववाडी या नगरपंचायतींना मिळावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती.
या मागणीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन कणकवली नगरपंचायतीला रु.35/- लाख देवगड नगरपंचायतीला रु.29.91/- लाख व वैभववाडी नगरपंचायतीला रु.29/- लाख असा एकुण रु.93.91 लाखांचा निधी मंजुर करुन दिला असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.
कणकवली विधानसभेतील या तिनही नगरपंचायतींना विशेष निधी प्राप्त करुन दिल्याबद्दल नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांचे विशेष आभार मानत आहोत. शिवसेना विकासासाठी कधीही कुणाच्या बाबतीत दुजाभाव न ठेवता नेहमीच विकासासाठी कटिबद्ध असते असे यावरुन सिद्ध झाले असल्याचे श्री.पारकर यांनी सांगितले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीची प्रचिती यावेळी आली आहे. यापुढे देखील कणकवली विधानसभा क्षेत्रासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक यांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधी मंजुर करुन आणला जाईल अशी ग्वाही शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!