*कोकण Express*
*वाघेरी गावातील कोरोना पोजिटिव्ह रुग्णाच्या मदतीला धावली शिवसेना- युवासेना*
*जि . प. सदस्य संजय आग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांच्या वतीने वाघेरी गुरववाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
*13 जून युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे वाढदिवस औचित्य- ८०℅ समाजकारण, २०℅ राजकारण*
*कणकवली :- संजना हळदिवे*
वाघेरी गावाला कोरोना ने विळखा घातला असून आतापर्यंत 67 रुग्ण पोजिटिव्ह भेटले आहेत तर 45 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.त्यात गुरववाडी मध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडले असल्याने संपूर्ण वाडी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहे .त्यामुळे तेथील लोकांना बाहेर जाणे बंद झाल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू भेटणं मुश्किल झालं होतं .अशातच शिवसेना त्यांना मदतीला धावली असून शिवसेना शाखा वाघेरी च्या वतीने ३० कुटुंबातील रुग्णाना भाजी व कडधान्य वाटप करण्यात आले आहे. यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रकाश वाघेरकर,उपसरपंच सौ.अनुजा राणे,पोलिसपाटील श्री.अनंत राणे, शाखाप्रमुख श्री.दत्तात्रय राणे,ग्रामस्थ श्री महेश पाटील, श्री,सिद्धेश कदम उपस्थित होते.