*कोकण Express*
*हुमरट- वाघेरी- घोणसरी प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ७ ची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध*
*नांदगाव रेल्वेस्थानक ते वाघेरीपर्यंत चा उर्वरित रस्ता होणार पूर्ण*
*युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांचा विशेष पाठपुरावा*
*कणकवली :- संजना हळदिवे*
युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांच्या पाठपुराव्याने, शिवसेना सचिव, संसदीय गटनेते, खासदार विनायकजी राऊत साहेब, पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत साहेब यांच्या शिफारशीने, महाराष्ट्र राज्य वार्षिक नियोजन सन-२०२०-२१ (State Budget) अंतर्गत मंजूर झालेल्या हुमरट- वाघेरी- घोणसरी या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यासाठी २.५ कोटी मंजूर रकमेची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सन 2018-19 मध्ये या रस्त्याचे नांदगाव रोड रेल्वेस्थानक ते वाघेरी गावठाण पर्यंत डांबरीकरण करण्यात आले होते. उर्वरीत वाघेरीपर्यंत रस्ता पूर्ण होण्यासाठी युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी सातत्याने खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळेच यावर्षीच्या बजेट मध्ये सुद्धा सदर रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता.
या रस्त्याचे नुतनीकरण होत असल्याने वाघेरीपासून ते पुढे लोरे- घोणसरी व पुढे कुर्ली गावाला हा रस्ता जोडत असून रेल्वेप्रवाशाना सोयीस्कर होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच कार्यारंभ आदेश मिळाल्यावर लवकरच प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होईल.
तसेच वाघेरी मुख्यरस्ता (वाघेरी जोडरस्ता ग्रामा. क्र. १०३) हा रस्ता लवकरच खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून मंजूर केला जाईल अशी ग्वाही जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांनी दिली असल्याची माहिती युवासेना जि. प. फोंडाघाट विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी दिली आहे.