शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी कणकवली पोलिसांच्या ताब्यात

शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी कणकवली पोलिसांच्या ताब्यात

*कोकण Express*

*शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी कणकवली पोलिसांच्या ताब्यात*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

अल्पवयीन शाळकरी मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी गौरव उदय तिरोडकर ( वय 20, रा. घुमडे -कातवड, ता. मालवण ) याला कणकवली पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद पीडित युवतीच्या नातेवाईकाने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी गौरव तिरोडकर याची फेसबुकवरून जिल्ह्यातील हायवेवरील तालुक्यातील अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर गौरव याने पीडित मुलीवर ती राहत असलेल्या गावात आणि मालवण तालुक्यातील गावात 30 जून, 2020 ते 16 फेब्रुवारी, 2021 दरम्यान शारीरिक अत्याचार केले. याबाबत आरोपी गौरव तिरोडकर वर पोक्सो अधिनियम 2012 चे कलंक 4, 6 तसेच भा. दं. वि. 376 (1 ), 376 (2), (N), 376 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गौरव हा गुन्हा दाखल झाल्यानंतरच्या प्राथमिक तपासात पुणे सिंहगड येथे असल्याचे आढळून आल्याने कणकवली पोलिसांनी तात्काळ आरोपीची माहिती पुणे पोलिसांना दिली. सिंहगड पोलिसांनी लागलीच आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपी गौरव याला ताब्यात घेण्यासाठी एपीआय सागर खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार संदेश आबिटकर, राहुल तळसकर यांचे पथक 10 जून रोजी रात्री पुण्याला रवाना झाले. आरोपी गौरव याला सिंहगड पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घेऊन एपीआय खंडागळे, अंमलदार आबिटकर, तळसकर 11 जून रोजी सायंकाळी कणकवलीत दाखल झाले असून आरोपी गौरव तिरोडकर याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्याची कारवाई सुरू आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!