*कोकण Express*
*देवगड तालुक्यात शाळांमधील अनधिकृत वर्ग बंद करण्याच्या सूचना*
*शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर*
*सिंधुदुर्गनगरी दि.11(जि.मा.का):*
जिल्ह्यातील अनधिकृत सूरु असलेल्या शाळांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार देवगड तालुक्यातील अनधिकृत सुरु असलेले वर्ग तात्काळ बंद करण्याच्या सुचना शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील पुढील शांळामध्ये अनधिकृत वर्ग सुरु आहेत. देवगड तालुक्यातील खुडी माध्यमिक विद्यालय, खुडी येथे इयत्ता 8 वीचा वर्ग अनधिकृत आहे. देवगड तालुक्यातील बापर्डे येथील यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय बापर्डे येथे इयत्ता 8वी ते 10वी चे वर्ग अनधिकृत आहेत. तरी या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याची खबरदारी विद्यार्थी व पालकांनी घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.