*कोकण Express*
*कणकवलीतील व्यापाऱ्यांना सोमवार पासून आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक!*
*बाजारपेठेत तीन ठिकाणी आरटीपीसीआर टेस्टसाठी तपासणी केंद्रे तैनात..!*
*व्यापाऱ्यांनी न.पं.ला सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी केले आवाहन!*
*कणकवली:- संजना हळदिवे*
कणकवली शहरातील सर्व व्यापाऱ्यांना सोमवार पासून कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असून बाजारपेठेत ३ ठिकाणी न. पं. कडून व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करिता टेबल लावण्यात येतील तेथे सर्व व्यापाऱ्यांनी आपली आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. किंवा स्वत: आरटीपीसीआर टेस्ट करायची असेल तर उपजिल्हा रुग्णालयात करून घ्यावी. असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.
दरम्यान, तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर राज्यातील कोरोना निर्बंध ७ जून पासून शिथील झाले असून सिंधुदुर्ग जिल्हा चौथ्या चरणात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेची दुकाने स. ७ ते ४ वा. पर्यंत चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तर कणकवलीत वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने तो रोखण्यासाठी आज कणकवली न.पं. मधे ७ जून रोजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे व व्यापारी यांची नगराध्यक्ष दालनात बैठक झाली होती. या बैठकीत सर्व व्यापारांना कोरोनाची आटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याची अंमलबजावनी ही लवकरच करण्यात येईल. त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांनी आपली कोरोनाची आटीपीसीआर टेस्ट करुण घ्यावी, असे आवाहन त्यावेळी करण्यात आले असता बैठकीत उपस्थित व्यापाऱ्यांनी आपण इतर व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय देवू असेही नगराध्यक्ष समीर नलावडे व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना सांगितले होते. त्यानुसार आरटीपीसीआर टेस्ट संबंधित व्यापाऱ्यांनी चर्चा केली असून आज कणकवली न. पं. मधे नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष समिर नलावडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, व्यापाऱ्यांच्या वतीने कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवकर, उपाध्यक्ष राजू पारकर, शेखर गणपत्ये यांची बैठक पार पडली. त्यावेळी न.पं. कडून व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करिता ३ ठिकाणी बाजारपेठेत टेबल लावण्यात येतील तसेच परस्पर कोणाला आरटीपीसीआर टेस्ट कारायची असेल तर त्या व्यापाऱ्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात करुण घ्यावी. तसेच आरटीपीसीआर टेस्ट केल्याचे ( निघेटीव्ह ) असल्याचे पुरावा म्हणून देण्यात येणारे रिसीट सोबत ठेवावे, अन्यथा सोमवार पासून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची न.पं. कडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, किशोर राणे, महेश सावंत उपस्थित होते.