*कोकण Express*
*पत्रकार परिषदा घेऊन टीका करून लोकांना त्याचा फायदा होत नाही!*
*भाजपवाल्यांनी आंदोलन करण्यापेक्षा रस्तावर उतरून काम करावे…*
*पालकमंत्र्यांची टीका ; रूग्णांकडुन अधिक रक्कम घेणा-यांना पैसे परत करण्याचे आदेश…*
*कणकवली :- संजना हळदिवे*
भाजपवाल्यांनी आंदोलने करण्यापेक्षा कोविडसाठी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करावे, नुसत्या पत्रकार परिषदा घेतल्या आणि टीका केली म्हणजे लोकांना त्याचा फायदा होत नाही,असा टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे लगावला. दरम्यान ज्या लोकांना कोविड सेंटर उपचारादरम्यान जास्त पैसे घेतले असा संशय आहे, त्यांनी तक्रार केल्यास तफावतीची रक्कम पुन्हा त्यांना देण्याची व्यवस्था केली जाईल,असा विश्वास श्री सामंत यांनी व्यक्त केला. आज झूमच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी आदी उपस्थित होते.