*कोकण Express*
*पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणसाठी बांदा येथे निघालेली रुग्णवाहिका माघारी बोलविली*
*बांदा ः प्रतिनिधी*
खनिकर्म विभागाच्या निधीतून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेतील एक रुग्णवाहिका बांदा येथे देण्यात आली होती. ही रुग्णवाहिका आज बांदा येथे येत असताना मुख्याधिकारी यांनी ही रुग्णवाहिका परत बोलवत शुक्रवारी ही रुग्णवाहिका पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल असे सांगितले आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे एखादा रुग्ण दगावल्यास पालकमंत्री जबाबदार राहतील असा इशारा सरपंच अक्रम खान यांनी दिला आहे. तर पालकमंत्र्यांनी घेतलेली भूमिका चुकीची असून, या काळात आम्ही राजकारण करणार नाही, असे सांगणाऱ्या सेनेचे खरे रूप दिसून आले आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या भूमिकेवर बांदा सरपंच अक्रम खान यांनी संताप व्यक्त करत, पालकमंत्र्यांनी बांदा वसियांच्या अपमान केला असून, कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ केला आहे. असा आरोप केला आहे. फक्त श्रेय घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी हा अट्टाहास केला आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. येत्या दोन दिवसात जर ही रुग्णवाहिका बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राप्त न झाल्यास आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा यावेळी सरपंच अक्रम खान यांनी दिला आहे.