माणगाव येथील दत्त मंदिर व राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जपला माणुसकीचा धर्म

माणगाव येथील दत्त मंदिर व राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जपला माणुसकीचा धर्म

*कोकण  Express*

*माणगाव येथील दत्त मंदिर व राष्ट्रीय स्वयंसेवकांनी जपला माणुसकीचा धर्म*

*जिल्हा रुग्णालयात गेले महिनाभर अन्न सेवा दिली जात आहे*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

प्रत्येक धर्मात अन्नदान हे श्रेष्ठदान समजले जाते. आणि याचा प्रत्यय आपल्याला धार्मिक स्थळांमध्ये येत असतो असेच कुडाळ तालुक्यातील माणगाव मधील तीर्थक्षेत्र दत्त मंदिर या मंदिरामधून महिनाभर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत अन्न सेवा दिली जात आहे. या सेवेला राष्ट्रीय स्वयंसेवक यांचेही सहकार्य लाभत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाला जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करण्यासाठी सुद्धा जागा नाही त्या ठिकाणी दोन वेळच्या जीवनाची भ्रांत असायची जिल्हा रुग्णालयातील असा कोणताही वार्ड नाही ज्या ठिकाणी रुग्ण नाही आणि या रुग्णांना मानसिक आधार हा त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळावा म्हणून त्या ठिकाणी रुग्णां सोबत कुटुंबातील व्यक्ती राहत असे. रुग्णांसाठी रुग्णालयातील जेवण हे मिळत असतं पण त्यांच्या सोबत राहणाऱ्या नातेवाईकांना जेवणाची व्यवस्था बाहेरून करणे शक्य होत नाही कारण त्या ठिकाणी असलेल्या कॅंटिंग मधील जेवण हे परवडणारे नाही आणि दूरवरून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दोन वेळच्या जेवणासाठी घरी जाणे येणे शक्य नाही.

रुग्णांच्या या नातेवाईकांची अडचण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जाणून घेतली आणि माणगाव येथील दत्त मंदिराच्या विश्वस्तांना याबाबत विचारणा करून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक वेळचे जेवण अन्नदान सेवेतून देता येईल का? असे विचारले आणि दत्त मंदिराच्या विश्वस्तांनी याला होकार दिला दि. ८ मेपासून अन्न सेवेला सुरुवात झाली यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रुग्णांच्या नातेवाईकांची नोंदणी करून सायंकाळचे जेवण हे दत्त मंदिरातून आणले जात होते सुरुवातीला या उपक्रमाला अल्प प्रतिसाद मिळाला पण त्यानंतर दत्त मंदिर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या नियमित सेवेने रुग्णांच्या नातेवाईकांनी आपली नोंदणी या राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या माध्यमातून केली त्यानंतर प्रत्येक दिवशी २०० ते २५० रुग्णांचे नातेवाईक या अन्न सेवेचा लाभ घेऊ लागले आता या अन्न सेवेला महिना होत आहे.

पण दत्त मंदिर विश्वस्तांनी कुठेही या सेवेत खंड पाडलेला नाही दुपारनंतर दत्तमंदिरामध्ये अन्न शिजवून ते चांगल्या प्रकारे पॅकिंग करून सायंकाळी ५ वाजता ओरोस या ठिकाणी पाठवले जाते हे जेवण घेऊन जाण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नियमित ठरलेल्या वेळेत माणगाव येथे उपस्थित असतात हा उपक्रम खरोखरच वाखाणण्याजोगा आणि तेवढाच कौतुकास्पद आहे या उपक्रमामुळे हजारो नातेवाईकांना पोटभर जेवण मिळाले आहे हा माणुसकी जपण्याचा खरा धर्म राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि दत्त मंदिराच्या विश्वस्तांनी दाखवून दिला आहे.

अन्न सेवेने खरा आनंद मिळतो- सचिव दीपक साधले

माणगाव येथील दत्त मंदिरात कोरोना काळापूर्वी दररोज अन्न सेवा सुरू होती. पण या सेवेमध्ये कोरोना महामारीमुळे खंड पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ओरोस येथे कोरोना बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्न सेवा सुरू करण्याचे सूचित केले त्यावेळी कोणतेही प्रश्न न करता या सेवेला होकार दिला या सेवेमधून खरा आनंद मिळतो असे दत्त मंदिराचे विश्वस्त सचिव दीपक साधले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!