*कोकण Express*
*पत्रकारांचे लसीकरण न करण्याचा आदेश नक्की कोणाच्या दबावाखाली?*
*अंकुश जाधव सभापती समाज कल्याण समिती*
*सिंधुदुर्ग ः ( संजना हळदिवे)*
कालच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४५ वर्षाखालील सर्व पत्रकारांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी देखील कणकवली तालुक्यातून सुरू करण्यात आली. याबाबत यामुळे संपूर्ण राज्यातूनच त्यांचे व जिल्हा परिषदेचे कौतुक करण्यात येत आहे. राज्य सरकारने व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी देखील वेळोवेळी पत्रकारांचे लसीकरण करण्याचे आश्वासन देऊन देखील त्यांना त्याची पूर्तता करता आली नव्हती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची संपूर्ण राज्याने दखल घेतली होती. मात्र आज अचानकपणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या प्रेसनोट मधे उद्या होणाऱ्या लसीकरणातून ४५ वर्षाखालील फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरण न करण्याचे आदेश देण्यात आलेला आहे. या अगोदर वेळोवेळी लसीकरण संदर्भात काढलेल्या कोणत्याही आदेशामध्ये फ्रंट लाईन वर्कर्स बाबत कधीही उल्लेख करण्यात आला नव्हता. मात्र आज अचानक पणे या आदेशामध्ये फ्रंट लाईन वर्कर्सचे लसीकरण न करण्याबाबतच्या सूचना कोणाच्या सांगण्यावरून व दबाव खालून दबावाखाली देण्यात आलेले आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्य सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री हे पत्रकारांचे लसीकरण करण्यात अपयशी ठरले व जिल्हा परिषदेने हा उपक्रम यशस्वी करून दाखवला. त्यामुळे राजकीय दबावाखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्वरित फ्रंट लाईन वर्कर्स व पत्रकार यांचे लसीकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी देखील करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्ष व खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे कारभार करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असून पुढील दोन दिवसात या आदेशामध्ये सुधारणा न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल..