*कोकण Express*
*विलवडे येथील ३२ लाखांची दारू जप्त*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी तालुक्यातील विलवडे येथे ३० रोजी पहाटे २ वाजता कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालयाच्यावतीने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर कारवाई करण्यात आली आहे. कारसह ५८ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २६ लाख ४ हजार रुपये रक्कमेची दारू पकडण्यात आली आहे. एकूण ५१ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. तर आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक एन पी रोटे, दुय्यम निरीक्षक सी एल कदम, जवान सागर चव्हाण यांच्या पथकाने कारवाई केली आहे.