*कोकण Express*
*शिक्षण व आरोग्य सभापती डाॅ. अनिषा दळवी यांच्या प्रयत्नाने Frontline Worker म्हणून काम करणाऱ्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे होणार लसीकरण*
*!..महा.राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग यांच्या मागणीला यश..!*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा- सिंधुदुर्ग यांनी आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी यांच्याकडे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकाना कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. त्या मागणी दखल घेत शिक्षण व आरोग्य सभापती डाॅ. अनिषा दळवी यांच्या प्रयत्नाने Frontline Worker म्हणून काम करणाऱ्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे लसीकरण होणार आहे.
कोविड १ ९ चा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे . जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णसंख्या वाढतच आहे. शासनाकडून कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात आले आहे. त्यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना प्राधान्याने लस देण्यात आलेली आहे. तसेच कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या ठराविक शिक्षकांना लस देण्यात आली मात्र उर्वरित शिक्षकांना अद्याप लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सध्या चेक पोस्ट, रेल्वे स्टेशन, आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालय येथे तसेच दि .०५ / ०५ / २०२१ ते १४/०५/२०२१ या कालावधीत माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत प्रत्यक्ष घरोघरी भेटी देऊन, प्रत्येक व्यक्तीची कोविड १ ९ ची आरोग्य तपासणी करणे, लक्षणे असल्यास व्यक्तिगत तपासणी करीता पाठविणे, कोमोर्वीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश : भेटून आरोग्य शिक्षण देण्यासाठी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. या मोहिमेतंर्गत काम करत असताना प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येणार असल्याने शिक्षकांच्या आरोग्यास धोका संभवू शकतो. त्यामुळे शिक्षकांना आरोग्य विषयक सोयी सुविधा पुरवून सर्व शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने पुन्हा एकदा आग्रही मागणी करण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्हयातील Frontline Worker म्हणून काम करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कोविड 19 संसर्गापासून सुरक्षितता म्हणून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील वय वर्ष 18 ते 44 व 45 च्या पुढील वयोगटातील जे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विविध प्रकारच्या कोविड कामकाजासाठी नियुक्त केलेले आहेत त्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला / दुसरा डोस आपल्या अधिनस्त ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर योग्य ते नियोजन करून देण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात यावी संबंधित कोविड 19 नियंत्रण व प्रतिबंधाकरिता कार्यरत शिक्षक 18-44 वर्षे वयोगटातील असतील तर त्यांचे Annex – III संबंधित मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने प्राप्त करून व ओळखपत्राची खात्री करून लसीकरण करून घ्यावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करणेत यावा. असा लेखी आदेश. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांना लेखी पारीत करण्यात आला आहे.
