*कोकण Express*
*वैभव नाईक मंत्री होण्याची स्वप्न सुशांत नाईक यांनी पाहू नयेत*
*आमदार वैभव नाईक यांना रत्नागिरीच्या मागूनच फिरावे लागणार
*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*
दररोज जिल्हाधिकारी कार्यालयात बसणारे नगरसेवक सुशांत नाईक यांचे बंधू आमदार वैभव नाईक यांना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करता आली नाही. जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेला आंदोलनाचा प्रश्न विरोधी पक्षाचे असून देखील आमदार नितेश राणे यांनी जाऊन मध्यस्थी करत सोडविला. त्यामुळे आमदार नितेश राणेंवर टीका करणाऱ्या सुशांत नाईक यांनी दिव्याखाली अंधार आहे ते अगोदर पाहावे. तसेच सुशांत नाईक यांनी किती टीका केली तरी आमदार वैभव नाईक यांना शिवसेना मंत्री बनवणार नाही. वैभव नाईक यांना रत्नागिरीच्या मागूनच फिरावे लागणार अशी टीका भाजपाचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री यांनी केली.कुडाळ -मालवणमधील जनतेने आता वैभव नाईक यांचे पोकळ काम ओळखले. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्यांना जनताच घरी बसवेल. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थापुरती फेल झाली असून सत्ताधारी पक्ष प्रशासन व सत्ता चालवण्यात पूर्णतः अपयशी झाला आहे. जिल्हावासीयांना आरोग्य सुविधा देण्यास सत्ताधारी ठाकरे सरकार फेल गेले आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून आमदार वैभव नाईक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मेस्त्री यांनी केली आहे. आमदार वैभव नाईक यांच्यापेक्षा भाजपचे दत्ता सामंत यांचे कुडाळ-मालवणमध्ये जोरदार काम सुरू आहे. त्यामुळे जनता निश्चितच भाजपच्या बाजूने पुढील निवडणुकीत उभी राहील. त्यामुळे सुशांत नाईक यांनी वैभव नाईक हे मंत्री होण्याची दिवास्वप्ने पाहू नयेत. गेल्यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला आलेली कोरोनासाठीचे २३ कोटी रुपये कुठे झिरपले ते आमदार वैभव नाईक यांना माहिती आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आजची आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा समोर येत आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना सेवा देण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडर व अन्य साहित्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यातील काहीच न करणाऱ्या वैभव नाईक यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेले पत्रे व कौले आपल्या नावावर वाटण्याचे काम केले. आमदार नितेश राणे यांच्यासारखे स्वतःच्या खिशात हात घालून मदत करण्याची मानसिकता वैभव नाईक यांच्यात नाही. जिल्ह्यात कोलमडलेल्या सर्व व्यवस्थेला सत्ताधारी म्हणून शिवसेना जबाबदार आहे. ही जबाबदारी स्वीकारून वैभव नाईक यांनी राजीनामा द्यावा असे आव्हान मेस्त्री यांनी दिले आहे.