*कोकण Express*
*मच्छिमार, बाग़ायतदार, शेतकऱ्यांना भरीव मदत देणार*
*कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे आश्वासन*
*देवगड ः प्रतिनिधी*
ताेक्ते चक्रीवादळात कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामधील नुकसानग्रस्त मच्छिमार, बागायतदार, शेतकरी व इतर नुकसानग्रस्ताना शासनाकडून मोठ्या प्रमाणात भरीव मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी देवगडमध्ये चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करून मच्छिमारांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांचासमवेत माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलिे, प्रदेश काँग्रेसचे राजन भाेसले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, प्रवक्ते इर्शाद शेख, विलास गावडे, अभय शिरसाट, महेंद्र सावंत, देवानंद लुडबे, साईनाथ चव्हाण, सुगंधा साटम, तालुकाध्यक्ष उल्हास मणचेकर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर, अरविंद माेंडकर, सुरज घाडी आदी उपस्थित हाेते. नाना पटाेले यांनी देवगड बंदर येथे भेट देवून मच्छिमारांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी जगन्नाथ काेयंडे, चंद्रकांत पाळेकर, द्विजकांत काेयंडे, प्रदीप काेयंडे, संजय बांदेकर आदी मच्छिमारांनी ताेक्ताे चक्रीवादळामुळे मच्छिमारांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना शासनाचे निकष बाजुला ठेवून जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी. ज्या नाैकांचे पुर्णत: नुकसान झाले त्यांच्या पुनर्वसर्नासाठी मदत करावी अशी मागणी केली. चक्रीवादळामुळे बागायतदार, मच्छिमारांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून त्यांना भरीव मदत केली जाईल असे आश्वासन नाना पटाेले यांनी यावेळी दिले आहे. यावेळी त्यांनी राज्यपाल कार्यालय हे सध्या भाजपाचे कार्यालय झाले आहे. राज्यापाल ही संविधानिक दृष्टया प्रमुख निर्णय घेणारी व्यक्ति आहे. विधान परिषदेवर नेमणूक करणेसाठी असलेल्या बाराजणांचा विषय प्रलंबित असून त्यांनी त्याबाबत निर्णय न घेता दाबून ठेवणे हा प्रकार चुकीचा आहे असे मत नाना पटाेले यांनी व्यक्त केले. विराेधक केवळ आराेप करीत आहेत. बेंबीच्या देठापासून ओरडण्यापेक्षा केंद्रशासनाकडून चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी मदत आणावी. अशी टीका देखील त्यांनी यावेळी विरोधकांवर केली आहे. यावेळी केंद्रशासन राज्यशासनाला पैसे देते म्हणजे उपकार करीत नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा पंतप्रधांनानी फक्त हवाई दाैरा केला होता. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तरी खाली उतरून पाहणी करीत हाेते असा टाेला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.