*कोकण Express*
*रुग्ण वाढ असलेल्या जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनचे संकेत*
कोरोनाच्या रुगणांची संख्या मुंबईसह राज्याच्या काही भागात घटू लागली असून ही समाधानाची बाब असली तरी राज्यातील ३६ पैकी १५ जिल्ह्यांत कोरोनाच्या रुगणांची आणि मृतांची संख्या वाढत आहे.
कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी रुग्ण वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. महसूलमंत्र बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ऑनलाईन आढावा बैठक घेतली त्यात हे संकेत देण्यात आले.
रुग्णवाढ कमी करण्यासाठी मुंबईचं अनुकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं समजतं.
अमरावती, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, सोलापूर, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधे रुग्णवाढ होत आहे.