१२वी परीक्षेसंदर्भात कुठलाच निर्णय नाही – वर्षा गायकवाड

१२वी परीक्षेसंदर्भात कुठलाच निर्णय नाही – वर्षा गायकवाड

*कोकण  Express*

*१२वी परीक्षेसंदर्भात कुठलाच निर्णय नाही – वर्षा गायकवाड*

राज्यातल्या बारावीच्या परीक्षांसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १२ वी ची अंतिम परीक्षा, तसंच नीट आणि जेईई मुख्य परिक्षांसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली. या ऑनलाईन बैठकिला माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी आणि सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री आणि सचिव उपस्थित होते. या बैठकीनंतर वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

बारावीच्या परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या.

कोरोनामुळे उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीतही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ दिलं जाणार नाही मात्र त्यांची सुरक्षितता महत्वाची असून विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

राज्यात यंदा दहावीची परीक्षा न घेण्यावर सरकार ठाम आहे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज घेता याबाबतची सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडणार आहोत, असं त्या म्हणाल्या. मात्र पुढील वर्षी मुलांचं नुकसान होऊ नये याकरता आतापासूनच नियोजन केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!