*कोकण Express*
*तुळस येथील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद*
*वेंगुर्ले ःःप्रतिनिधी*
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग , तुळस व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित सलग १७ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ४१ जणांनी रक्तदान केलं. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस(तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बाहुउद्देशीय सभागृह) येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक दयानंद गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर तुळस सरपंच शंकर घारे, सामाजिक कार्यकर्ते मनीष दळवी, संतोष गावडे, जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश घुंगुरकर, वैदयकीय अधिकारी डॉ. अभिनंदन मोरे, रक्तपेढी तंत्रज्ञ प्रकाश तुप्पड, सिंधुरक्तर मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष महेश राऊळ, वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव प्रा. सचिन परुळकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ऍलिस्टर ब्रिटो, खजिनदार राजेश पेडणेकर, ग्रा.प. सदस्य जयवंत तुळसकर, श्रद्धा गोरे, सुजाता पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते. वेताळ प्रतिष्ठानने कोरोना कालावधीत जनजागृती करिता सातत्याने उपक्रम राबविले त्याच बरोबर काळाची गरज जाणून रक्तदान शिबिराचे तीन वेळा आयोजन करून प्रतिष्ठानने आदर्शवत काम केले आहे, तसेच कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही रक्तदान करण्यास रक्तदाते पुढे येऊन ईश्वरी कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचेही कौतुक सरपंच शंकर घारे यांनी केले. तसेच सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक दयानंद गवस यांनी मनोगत व्यक्त करताना सामाजिक जाणिवेतून प्रतिष्ठान नियमित रक्तदान शिबिर आयोजित करीत असते परंतु कोरोना कालावधीत शिबिराचे आयोजन रक्तदात्यांच्या उत्तम प्रतिसाद मिळवून चळवळीत मोलाचे योगदान देत असल्याचे प्रतिपादन केले. शिबीर यशस्वी नियोजनासाठी किरण राऊळ, सद्गुरु सावंत,अक्षता गावडे, कुंदा सावंत, प्रशांत सावंत, रोहन राऊळ, प्रवीण राऊळ, प्रदीप परुळकर, सागर सावंत, बंटी सावंत, उदय परुळकर, साई भोई, विनायक सावंत,गणेश सावंत, निखिल ढोले, ओंकार राऊळ, सचिन राऊळ, राजदत्त गोरे, तनुजा गोरे, प्राची गोरे, राजेश चौगुले, मंगेश सावंत,गणेश राऊळ,समीर गावडे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास तिरोडकर तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.