*कोकण Express*
*काँग्रेस चे दिवंगत नेते वाय डी सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
काँग्रेसचे दिवंगत नेते वाय डी सावंत यांचे सुपुत्र मकरंद सावंत यांनी आपल्या वडीलांप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपत कणकवली नगरपंचायत च्या कोव्हीड केअर सेंटर ला वैद्यकीय साहित्य प्रदान केले. मकरंद सावंत यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे 15 ऑक्सिमिटर, 15 थर्मल गन आणि 15 रक्तदाब तपासणी मशीन सुपूर्त केले. भाजपा नगरसेविका मेघा सावंत यांचे मकरंद हे बंधू आहेत. यावेळी गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक शिशिर परुळेकर,माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत, संदीप राणे आदी उपस्थित होते.