*कोकण Express*
*बांदा सटमटवाडी कालव्यासाठी ३१ मे ची डेटलाइन*
*बांदा ः प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी प्रकल्पातून वेंगुर्ला येथे जाणाऱ्या बांदा सटमटवाडी येथील कालव्याचे काम पूर्ण न झाल्यास आणि अपूर्ण कालव्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई येत्या ८ दिवसांत न केल्यास ३१ मे रोजी पाण्यात उभे राहून उपोषण करण्याचा इशारा भानुदास दळवी यांनी पाटबंधारे विभागाला दिली आहे. यावेळी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असे म्हंटले आहे की, कालव्याच्या बोगस कामामुळे बांदा सटमटवाडी येथील लोकांच्या शेतीला व घरांना दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा देखील फटका या कालव्याच्या गळतीने येथील लोकांच्या बागायतीला व घरांना बसला असून त्याचबरोबर रस्ते सुध्दा यात वाहून गेले आहेत या झालेल्या नुकसानीची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी तसेच कालव्याच्या दुरूस्तीचे काम येत्या आठ दिवसांत झाले नाही तर ३१ मे रोजी कालव्याच्या पाण्यात आंदोलन उपोषणाला बसणार आहे यावेळी काही जीवितहानी घडल्यास तिलारी पाटबंधारे विभागच जबाबदार राहिल असा इशारा बांदा सटमटवाडी येथील रहिवासी भानुदास सखाराम दळवी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.