कणकवली पटवर्धन चौकातील रॅपीड टेस्टमध्ये दोन महिला पॉझिटीव्ह

कणकवली पटवर्धन चौकातील रॅपीड टेस्टमध्ये दोन महिला पॉझिटीव्ह

*कोकण Express*

*पटवर्धन चौकात आज विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन रॅपिड टेस्टमध्ये दोन महिला पॉझिटीव्ह*

*अकरा नंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई*

*कणकवली ः ( संजना हळदिवे)*

शहरातील पटवर्धन चौकात आज विनाकारण फिरणाऱ्यांची अँटिजन रॅपिड टेस्ट करण्यात आली. यात दोन महिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्‍यांना गृहअलगीकरण किंवा कोविड सेंटरमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्‍यान सकाळी अकरा वाजल्‍यानंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्या चार फळ विक्रेत्‍यांवर पोलिसांनी आज कारवाई केली.
कणकवली शहरात कोरोना बाधितांची संख्या सातत्‍ाने वाढतीच राहिली आहे. तरीही बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे. याखेरीज सकाळी अकरानंतरही भाजी आणि फळ विक्रेते आपली दुकाने सुरू ठेवत होते. त्‍यामुळे या विक्रेत्त्‍यांना पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी त्‍यांच्यावर जिल्‍हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्‍या प्रकरणी कारवाई केली. दरम्‍यान आज शहरात आलेल्‍यांची रॅपिड टेस्ट कऱण्यात आली. यात दोघा महिलांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील एक युवती नागवे भटवाडी येथील तर दुसरी महिला कलमठ गुरववाडी येथील आहे. येथील पटवर्धन चौकात गेले महिनाभराहून अधिक काळ रॅपिड टेस्ट केली जात आहे. यात काल (ता.२१) सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर आज दोघा महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या पथकामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्वी पारकर, शिक्षक गिल्बर्ट फर्नांडिस, प्रदीप मांजरेकर कार्यरत आहेत. तालुका समन्वयक निखिल जाधव यांनी देखील या ठिकाणी येत आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!