*कोकण Express*
*”महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना” या कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या ‘त्या’ १५०० प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे!*
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्याकडे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी…!*
*कणकवली ः ( संजना हळदिवे)*
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती शासन योजना २०१९ जाहीर केली. त्यानुसार शासनाने दि. ०१/०४/२०१५ ते ३१/०३/२०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची दि. ३१/०३/२०१९ अखेर असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची थकीत येणे रक्कम रु. २. ०० लाख (मुद्दल + व्याज) पर्यंत माफ करणे, बाबतचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार अंमलबजावणी चालू आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी शेती कर्जाची परतफेड नियमित करीत असल्याने या जिल्ह्याला शासनाच्या कर्जमाफी योजनेमध्ये सातत्याने कमी लाभ मिळालेला आहे. तसेच जिल्ह्यातील अंदाजे १५००
शेतकऱ्यांनी शेतीची कर्जाची परतफेड मुदततीत केल्याने शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये त्यांचा समावेश झालेला नाही. त्यांना प्रोत्साहन अनुदान देऊन त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत
यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.