*कोकण Express*
◾*सकाळचे बातमी अपडेट / २२ मे शनिवार*
◾ राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
◾ महाराष्ट्र राज्यात गेल्या 15 एप्रिल 2021 पासून – शिवभोजन थाळी मोफत करण्यात आली – या निर्णयाची मुदत काल 14 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे
◾ शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी – पीएम किसानचे 2 हजार जमा झाले नसतील तर – पीएम किसानच्या 155261 या हेल्पलाइनवर करा तक्रार
◾ कोव्हिशील्ड लसीचा तिसरा डोस घेतल्यानंतर – सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळेल – असे ऑक्सफर्डच्या तज्ञांनी सांगितले
◾ गोव्यात फिरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी – गोव्यात 31 मेपर्यत कर्फ्यू लागू राहणार – गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
◾ राज्यातील वैद्यकीय परीक्षा आता रद्द करणे शक्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयारीला लागा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती
◾ हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे – मान्सून अंदमानात दाखल झाला आहे
◾ यंदा 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात – तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून दाखल होईल – असे हवामान विभागाने सांगितले.