*कोकण Express*
*तौक्ते चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेली विद्युत यंत्रणा तात्काळ पूर्ववत करावी…*
*सिंधुदुर्ग दि.१७*
तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांतील उद्ध्वस्त झालेली विद्युत यंत्रणा तात्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. तौक्ते चक्रीवादळामुळे हजारो विजेचे पोल उन्मळून पडले आहेत. अनेक वीजवाहिन्या तुटून गेल्या आहेत. तसेच शेकडो ट्रान्सफॉर्मर निकामी झाले आहेत परिणामी तौक्ते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील विद्युत पुरवठा हा मागील तीन दिवसांपासून शंभर टक्के बंद झाला आहे. दुर्दैवाने कोरोना मारामारीचा उपद्रव हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हजारो रुग्ण हे कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत. त्यांच्या उपचारासाठी तातडीने विद्युत पुरवठा सुरू करून देणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील विद्युत महामंडळाकडे असलेला अपुरा कर्मचारी वर्ग पाहता विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ झाले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या इतर भागांतील कर्मचारी व अभियंते विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याप्रमाणे आताही चक्रीवादळामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील उद्ध्वस्त झालेली विद्युत यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी व अभियंतावर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये पाठवण्याची व्यवस्था करावी ,अशी मागणी केली