*कोकण Express*
*आमदार नितेश राणे यांनी केला कोरोना रॅपिड टेस्ट किटचा पुरवठा*
*कणकवली तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात दिले किट*
*कोरोना टेस्ट रिपोर्ट काढण्यास व्यत्यय येऊ नये म्हणून दिला मदतीचा हात*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोना टेस्ट रिपोर्ट घेण्यासाठी रॅपिड टेस्ट किटचा तुटवडा भासूनये म्हणून प्रशासनाला आमदार नितेश राणे यांनी मदतीचा हात दिला आहे. १ हजर रॅपिड टेस्ट किट ते जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात देत आहेत. आज कणकवली तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे या रॅपिड टेस्ट किट आरोग्य आधिकाऱ्यांनकडे देण्यात आल्या.
कणकवली तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना टेस्ट सुद्धा तेव्हढ्याच मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोना तपासणी साठी लागणारे रॅपिड टेस्ट किट कमी पडू नये आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि कोरोना निदान लवकरात लवकर व्हावे यासाठी आम. नितेश राणे यांनी हे किट दिले आहेत, तालुक्यातील काळसुली, कनेडी, फोंडा, नांदगाव, तळेरे, खारेपाटण, वरवडे, या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे ही रॅपिड टेस्ट किट देण्यात आले. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते डॉक्टर शिकलगार व डॉ.सतीश टाक यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, पपू पुजारे,विजय चिंदरकर, समर्थ राणे, स्वप्नील चिंदरकर, सचिन पाराधिये, प्रसाद देसाई, अजय घाडीगांवकर,बाळा पाटील आदी उपस्थित होते.