*कोकण Express*
*माजी जि.प. सदस्य समीर नाईक यांचे निधन*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा अध्यक्षा सौ.समिधा नाईक यांचे ते पती*
*वेंगुर्ले तालुक्यासहीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समिर नाईक यांच्या निधना मुळे पसरली शोककळा*
*वेंगुली ः प्रतिनिधी*
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावचे रहिवासी माजी जि.प. सदस्य समीर नाईक (५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी जि.प. अध्यक्षा समिधा नाईक यांचे ते पती होत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य म्हणून समीर नाईक यांनी आपल्या कालावधीत विविध विकास कामे आणली होती.तसेच गोरगरिबांनाही ते मदतीचा हात नेहमी पुढे करत असत.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून समिर नाईक यांची ओळख होती.तर मित्र परिवारही त्यांचा खुप मोठा आहे.तसेच ते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक होते.त्यांच्या अचानक निधनाची माहिती कळताच वेतोरा गावासह वेंगुर्ला तालुक्यासहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.