*कोकण Express*
*भंगसाळ नदीतून चीपी विमानतळासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईप लाईनच्या कामाला स्थगिती द्या*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ येथील भंगसाळ नदीचे पाणी चीपि विमान तळावर नेण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईप लाईन चे काम सद्यस्थितीत स्थगित करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक राकेश कांदे यांनी म.औ.वि. उप विभाग चे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग होत असून, या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तसेच या नदी पात्रात पाण्याची पातळी खालावलेली दिसत आहे. या पाण्यावर कुडाळ शहरासह लगतची काही गावे देखील अवलंबून असून, तेथील शेतकरी देखील याच पाण्यावर अवलंबून आहेत. तर मे अखेरीस या भागातील विहिरी देखील कोरड्या पडतात. त्यामुळे भविष्यात येथील लोकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागू शकते . त्यामुळे गावातील लोक प्रतिनिधी आणि ग्रामस्थांशी बैठक घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदनातून केली आहे. तसेच स्लॅब ड्रेन पूर्ण होत नाही तोपर्यंत या नदीतील पाणी विमानतळाला देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी शहराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कांदे, सोबत ओबीसी जिल्हाध्यक्ष सौ. दीपलक्ष्मी पडते, माजी उपनगराध्यक्ष श्री. अनंत धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर , महिला शहराध्यक्ष सौ.ममता धुरी , शक्ती केंद्र प्रमुख राकेश नेमळेकर आदी उपस्थित होते.