*कोकण Express*
*माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याला तातडीने प्लाझ्मा मशीन खरिदी करण्यासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी पत्राद्वारे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सद्य स्थितीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रुग्ण संख्या वाढत असून यातून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतात. त्यासाठी लवकरात लवकर ही मशीन या दोन्ही जिल्ह्यासाठी द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.