*कोकण Express*
*कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या देवगड मधील पडेल गावी मनसे तर्फे मोफत सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगडच्या पडेल गावी कोरोनाची रुग्णांनची संख्या वाढत असल्यामुळे व अपुऱ्या आरोग्य यंत्रणेमुळे गावात भीतिचे वातावरण आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, ग्रामपंचायत सदस्य अमित घाडी, संपर्क अध्यक्ष नितीन पवार यांच्या तर्फे पडेल गावात मोफत सोडिअम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत आहे.
या कोरोनाकाळात केलेल्या फवारणी उपक्रमाबाबत ग्रामस्थांनी माननीय राजसाहेब ठाकरे, सरचिटणीस जिजी उपरकर, मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम, ग्रामपंचायत सदस्य अमित घाडी, संपर्क अध्यक्ष नितीन पवार व तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांचे आभार मानले.