रुग्णांची परवड रोखण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांचा मदतीचा हात

रुग्णांची परवड रोखण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांचा मदतीचा हात

*कोकण  Express*

*रुग्णांची परवड रोखण्यासाठी नगराध्यक्ष संजू परब यांचा मदतीचा हात*

*कोविड सेंटरसाठी उपलब्ध केले १५० बेड*

*ग्रामीण आरोग्य केंद्रानाही करणार २० बेडचा पुरवठा*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कोरोनाची शहरातील व तालुक्यातील वाढती रूग्णसंख्या व रुग्णांना कमी पडणारे बेड या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वखर्चाने १७० बेड खरेदी केले असून हे बेड सावंतवाडीत दाखल झाले आहेत. यामुळे तालुक्यातील कोवीड केअर सेंटर मध्ये या १५० बेडची भर पडणार असून यातील २० बेड ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात दिले जाणार आहेत. यामुळे रूग्णांची बेड अभावी होणारी परवड टळणार आहे. नगराध्यक्षांच्या या उपक्रमामुळे सावंतवाडीतील आरोग्य यंत्रणेला हातभार लागला आहे.

नगराध्यक्षांनी दिलेल्या या १७० बेडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, मनोज नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या संकल्पनेच कौतुक करत अभिनंदन केले. लोकप्रतिनिधी तसेच दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे येऊन अशा पद्धतीने बेड जिल्ह्यात उपलब्ध केल्यास कोविड रुग्णांना बेडची कमतरता भासणार नाही अस मत त्यांनी व्यक्त केलं. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर तसेच तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनीही नगराध्यक्षांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत आभार मानले.

कोरोना योद्धा असलेल्या नगराध्यक्ष संजू परब यांनी गतवर्षीही संपूर्ण देश लॉकडाऊन असताना सावंतवाडी शहरात व तालुक्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना तसेच गोरगरीब नागरिकांना धान्य तसेच गरजेच्या वस्तूंची वाटप केले होते. त्याचप्रमाणे कमळ थाळीच्या माध्यमातून तब्बल एक महिना मोफत जेवणाची व्यवस्थाही केली होती. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकार आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी मास्क व सॅनिटायझर चे वाटपही केले होते. स्वतःची तब्येत बरी नसतानाही प्रत्यक्ष फिल्डवर उतरून त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता. याच पार्श्‍वभूमीवर त्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे शहरासह तालुक्यातही त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!