*कोकण Express*
*लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण बाजारपेठेत प्रचंड गर्दी…*
सोशल डिस्टन्सचा फज्जा ; मासे-चिकनसाठीही झुंबड…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून ते १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पुढील ७ दिवस जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे खारेपाटण बाजारपेठेत आजूबाजूच्या सुमारे ३० ते ४० गावच्या नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता.
दरम्यान उद्यापासून होणाऱ्या जिल्ह्यातील कडक लॉकडाऊनला खारेपाटण व्यापारी व नागरिक पाठिंबा देऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आस्थापना बंद ठेऊन प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे खारेपाटण नागरिक व व्यापारी बंधूनी सांगितले.
खारेपाटण बाजारपेठेत आज सकाळी ८ वाजल्यापासूनच नागरिकांची व ग्राहकांची सामानाची खरेदी करण्यासाठी गर्दी उसळली होती. कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर राखण्यात आले नव्हते. तर अत्यावश्यक सेवे बरोबरच अन्य व्यवसायिकांनी देखील आपली दुकाने उघडी ठेवली होती. खारेपाटण मासळी मार्केट मध्येही नागरिकांची मासे, मटण व चिकन खरेदी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती.